ओरोस /-

जिल्हा काँग्रेसने आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पोलादी महिला भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनी सत्याग्रह आंदोलन प्रदेश काँग्रेसने दिलेल्या 40 कार्यकर्त्यांच्या मर्यादेत करण्यात आले.

यावेळी आंदोलन स्थळी काँग्रेसचे निरिक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख,सरचिटणीस महेंद्र सावंत, उपाध्यक्ष विजय प्रभू, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, एनएसयुआय अध्यक्ष कौस्तुभ गावडे, युवक कार्याध्यक्ष सिद्धेश परब, किरण टेंबूलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर,देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर,वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा सचिव बाळू अंधारी, बाळू वस्त,खलिल बगदादी, सुरेश देवगडकर,विजय कुडतरकर, अरविंद मोंडकर,युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, टिळवे मॅडम,राम धानावडे, राघू नार्वेकर,समीर वंजारी,इंद्रनील अनगोलकर, दीपक पिरनकर, अमेय सुकी, महेंद्र मांजरेकर, चंदन पांगे, प्रवीण वरूनकर, सरदार ताजर इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page