रत्नागिरी /-

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने मांडवी पर्यटन विकास सेवा सह . संस्था आणि सागरी सीमा मंच रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ रत्नागिरी मांडवी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम घेण्यात आली . लॉक डाउन सुरु झाल्यापासून ८ महिने किनाऱ्यावरील स्वच्छता लांबणीवर पडली होती . मांडवी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता . अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यापासून पर्यटकांचा ओढा मांडवी समुद्रकिनारी वाढू लागला होता अश्यावेळी प्लॅस्टिकचा कचरा सगळीकडे पसरल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरत होती अश्यावेळी शनीवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत मांडवी पर्यटन संस्था आणि सागरी सीमा मंचच्या वतीने नगरसेविका सौ दया चवंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मॅनेजर मुर्तुजा अमरेलीवाला , भूषण डहाणूकर , रवी फळणीकर , अनिल त्रिपाठी ,श्री पाटील यांच्यासहीत अनेक अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते . मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर उपाध्यक्ष नगरसेवक नितीन तळेकर , नगरसेविका दयाताई चवंडे , स्थानिक नगरसेवक संतोष ( बंटी ) कीर , कांचन मालगुंडकर ,अमित पेडणेकर, सागरी सीमा मंचाचे कोकण विभाग प्रमुख श्री संतोष पावरी , स्वप्निल सावंत , सौ तनया शिवलकर, रंजन आगाशे यांच्या सहीत मांडवी गाव संघशाखेचे पालक निखिल आपटे, शाखेचे कार्यकर्ते ,कारुण्य मरीन एक्सपोर्टचे ५० कर्मचारी स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते . याचसोबत मांडवी ग्रामस्थ बिपिन शिवलकर , बंड्या सुर्वे , बावा मोरे , उदय हातिसकर , रतन भरणकर , श्रेयस कीर , रोहित मायनाक , नंदु मोरे त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर रोज चालायला येणारे नागरीक या अभियानात सहभागी झाले होते . स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरीकाला मास्क आणि हॅंडग्लोव्हज देण्यात आले होते सोशल डिस्टंसिंग पाळत हे अभियान राबविण्यात आले . मोठ्या प्रमाणावर जमविलेला प्लास्टिकचा कचरा नगरपरिषदेच्या गाड्यांमध्ये भरण्यात आला . सर्व कार्यकर्त्यांना आदित्य वारंग आणि गजेंद्र वारंग यांनी पाणी आणि नाष्टा उपलब्ध करुन दिला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page