नवी दिल्ली /-

आज बहुतेक घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जातो. देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. एलपीजीचा वापर करणाऱ्या करोडो ग्राहकांसाठी आता अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती सविस्तर समजून न घेतल्यास तुम्हाला एलपीजी गॅस मिळण्यास अडचणी येवू शकतात.

दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चोरीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे.एलपीजी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे.

ज्याअंतर्गत 1 नोव्हेंबर पासून ग्राहकांना सिलेंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.यापूर्वी घरगुती गॅसचं फक्त बुकिंग केल्यास गॅस मिळत होता. मात्र, आता फक्त गॅसच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.
हा ओटीपी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. हा ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंडर दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

तसेच जर ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर डिलिव्हरी पर्सन एका अॅपच्या माध्यमातून तुम्हाला लगेच तो नंबर अपडेट करून देईल. त्या अॅपच्या माध्यमातून रिअल टाईम बेसिसवर मोबाईल नंबर अपडेट होईल. त्यानंतर अपडेट केलेल्या मोबाईल नंबरवरच कोड जनरेट सुविधा देण्यात येईल.
लवकरच हे नियम सर्व खेड्यापाड्यांमध्येही लागू होण्याची शक्यता आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर घेण्यासाठी अडचणीना सामोरं जावं लागू शकतं.जर कोणत्या ग्राहकाने एलपीजी कंपनीला चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावर गॅस सिलेंडर न मिळण्याचं संकटही ओढावू शकतं. माहितीनुसार पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून ही प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page