नवी दिल्ली /

▪️देशभरातील जनता कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झाल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.

▪️बिहारमधील निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने कोरोना प्रतिबंधल लस आल्यास तेथील जनतेला मोफत देण्याचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे.

▪️ त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत मोफत लस मिळायला हवी, अशी मागणी अनेक राज्यांकडून होऊ लागली आहे.

▪️संपूर्ण देशातील जनता कोरोना संसर्गाला तोंड देत असल्यामुळे ही लस सगळ्यांनाच मोफत उपलब्ध व्हावी, असे मत केजरीवाल यांनी दिल्ली ईशान्येतील उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

▪️कोरोना प्रतिबंधक लस जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हा ती मोफत मिळावी, हा देशातील जनतेचा हक्कच असल्याचेही ते म्हणाले.

▪️विशेष कोव्हिड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण केले जाईल. केंद्राकडून अत्यावश्यक गटासाठी थेट लस उपलब्ध करून दिली जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

▪️केंद्राकडून ही लस राज्य आणि जिल्हा यंत्रणेला थेट खरेदी करता येईल, त्यानंतर ती अत्यावश्यक गटांना उपलब्ध करुन देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page