कणकवली /-

विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण दरेकर यांनी आज सायंकाळी खारेपाटण गावाला भेट दिली. व खारेपाटण येथील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड,आमदारमाजी आमदार व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री राजन तेली,कणकवली सभापती दिलीप तळेकर, भाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री संतोष कानडे,जि. प.बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री रवींद्र शेट्ये,डॉ.मिलिंद कुलकर्णी, तसेच कणकवली तहसीलदार श्री रमेश पवार,कणकवली गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण,विभागीय कृषी अधिकारी एस एस हजारे, कणकवली तालुका कृषी अधिकारी श्री सुभाष पवार,मंडल अधिकारी मंगेश यादव,माजी महिला बालकल्याण सभापती श्रीमती रत्नप्रभा वळंजू,प स सदस्या सौ तृप्ती माळवदे,श्री रवी पाळेकर,खारेपाटण विभाग भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर ,खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,उपसरपंच इस्माईल मुकादम,वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे,भाजप कार्यकर्ते राजन चिके,सुधीर कुबल,राजेंद्र वरुणकर,राजा जाधव,खारेपाटण ग्रामपंचयत सदस्य योगेश पाटणकर,सौ उज्वला चिके,शमशुद्दीन काझी,आदी अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान खारेपाटण येथील परतीच्या पावसाने आणि खारेपाटण मध्ये पूर आल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.खारेपाटण येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली तसेच ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा आहे अशा शेतकऱ्यांची नावे अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून दोन दिवसात प्रशासनाला काळवावीत असे सक्त आदेश यावेळी विरोध पक्षनेते श्री दरेकर यांनी दिलेत.

“कोकणातील शेतकरी हा कमी प्रमाणात अर्थात गुंठे जमिनी मध्ये शेती करणारा असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना तशा पद्धतीने विचार करून भात शेतीच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल.” असे देखील श्री दरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page