विजयादशमीच्या निमित्ताने संघटनेचा अभिनव उपक्रम..

कुडाळ /-

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने दसरा सणाच्या निमित्ताने शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी साफसफाई करण्यात आली. सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या परंतु राजकीय तसेच शासकीय नाकर्तेपणामुळे दुर्लक्षित राहिलेल्या शिवस्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले होते. ही बाब शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या निदर्शनास येताच शिवप्रेमींनी स्मारकाची साफसफाई सोशल डिस्टन्स पाळून करण्यात आली. विजयादशमीच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने स्मरकावर तोरणे बांधण्यात येणार आहे. यावेळी सुशील सावंत, कृष्णा वेंगुर्लेकर, भूषण शेलाटे, दक्ष पटेल, नितीन ओरस्कार, शुभम गवारे, मुन्ना आजगावकर, ओंकार मांडोलकर ,शंकर पंदारे, प्रथमेश डिगस्कर, दैवेश रेडकर, स्वरूप वाळके, शैलेश राऊत, राजू हळदणकर, लक्ष्मीकांत राणे, रमाकांत नाईक, हर्षल पार्सेकर, निरकांत चव्हाण, मंदार पडवळ,
अभीजीत वंजारे, आनंद सावंत, अनिकेत जंगले, वैभव परब, स्वप्नील गुरव, संदेश बागवे, आशुतोष सावंत, हार्दिक शिगले, प्रसाद नालंग, नागेश सावंत आदी शिवप्रेमी मोहिमेत सहभागी झाले होते.

ओरोस फाटा बरोबर कुडाळ येथील माँसाहेब जिजामाता पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, झाराप, आकेरी, कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच रांगणा गडावर शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने विजयादशमी निमित्त पुष्पहार अर्पण तसेच तोरण बांधण्यात येणार आहे.

पाठपुरावा करूनही प्रशासन करतय दुर्लक्ष!
ओरोस फाटा येथील शिव स्मारकाला तातडीने देखभाल दुरुस्तीची आवश्यकता आहे. यासंदर्भात वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. एरव्ही शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारे पक्षही स्मारक प्रकरणी कमालीचे गप्प आहेत, याचे आश्चर्य अनेक जण व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page