ब्युरो न्यूज /-

शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास खुप अशक्तपणा येतो. तसेच विविध आजारांची लागण होते. यामुळे कमजोर झालेले शरीर आजारांचा सामना करू शकत नाही. यासाठी शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यास रक्त शुद्ध करणारे आणि वाढवणारे आयुर्वेदिक उपाय आपण करू शकतो. आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती सांगणार आहोत.

●शिंघाडा

शिंघाडा शरीरात रक्त आणि ताकद निर्माण करतो.कच्चा शिंघाडा खाल्ल्यास शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

●मनुका, डाळी आणि गाजर

मनुका, डाळी आणि गाजराचे नियमितपणे सेवन करा. रात्री झोपताना दुधामध्ये खारीक टाकून दुध प्यावे. या उपायाने रक्त वाढते.

●कॉफी, चहा टाळा

•कॉफी आणि चहाचे सेवन कमी करावे. ही पेय शरीराला आयर्न घेण्यापासून रोखतात.

●आवळा, जांभूळ रस

•आवळा आणि जांभळाचा रस सम प्रमाणात सेवन केल्यास हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

●अंकुरित धान्य

•गहू, मुग, हरभरे, मटकी अंकुरित करून त्यावर लिंबू पिळून सकाळी नाश्त्यात समावेश करा.

●आंबा

•पिकलेल्या आंब्यातील गर गोड दुधासोबत सेवन करा. अशाप्रकारे आंब्याचे सेवन केल्यास रक्त लवकर वाढते.

●फळांचे सेवन

•डाळिंब, पेरू, चिकू, सफरचंद, लिंबू इत्यादी फळांचे सेवन केल्यास रक्त वाढते.

●तीळ आणि मध

•2 चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्यानंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून याचे सेवन करा. या उपायाने रक्त वाढू लागेल.

●सफरचंद, बीट ज्यूस

शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी दररोज सफरचंदचे ज्यूस घ्यावे. बीटच्या एक ग्लास रसामध्ये चवीनुसार मध मिसळून दररोज याचे सेवन करावे.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना भिकाजी वागरे यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page