वेंगुर्ला /-

सहकार आणि महिला संघटनेतील धडाडीच्या कार्यकर्त्या, राणेसमर्थक भाजपा रेडी विभाग अध्यक्षा व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, व माजी उपसरपंच, सौ.सायलीताई पोखरणकर यांच्या शिवसेनेत प्रवेशाने शिवसेना महिला आघाडी रेडीत आणखी भक्कम होणार आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत आणि शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत सौ.सायली पोखरणकर, यांच्या समावेत युगा भगत, साक्षी कांबळी, निधी बागायतदार, अंकिता आसोलकर, बिंदीया कृष्णाजी, आनंदी कृष्णाजी, सुधा पांडजी, शीतल बूजजी आदी महिला कार्यकर्तीनी व परुळे येथील महिला कार्यकर्त्या सौ.प्रतीक्षा करलकर यांनी शिवसेना प्रवेश केला.

वेंगुर्ला महिला तालुकाप्रमुख सौ.सुकन्या नरसुले यांनी या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले.महिला उपजिल्हासंघटक सौ.श्वेता हुले व महिला शहरप्रमुख सौ.मंजुषा आरोलकर, उपनगराध्यक्ष सौ.अस्मिता राऊळ व नगरसेविका सुमन निकम यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.आजच्या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख सर्व श्री.आबा कोंडसकर, बाळा दळवी व सुनील डुबळे आणि नगरसेवक श्री.संदेश निकम व श्री.सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.

महिला उपतालुकाप्रमुख सौ.नम्रता बोवलेकर, व महिला विभागप्रमुख अनन्या धावडे, रश्मी डीचोलकर, मनाली हळदणकर, मनीषा नेवाळकर, सावली आडारकर आणि रेडीच्या महिला कार्यकर्त्या वंदना कांबळी, स्नेहा साळगावकर, शिल्पा वास्त, वैशाली वडर आणि महिला शाखाप्रमुख उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते म्हणाले की पूर्वाश्रमीचे अनेक शिवसैनिक हा पुन्हा स्वगृही परतत आहेत. आम्ही ४ वर्षां पूर्वी पुन्हा स्वगृही आलो आणि शिवसेनेच्या ह्या कुटुंबात आल्या नंतर पुन्हा तोच मान तोच सन्मान मिळाला. तुमचे या परिवारात पुन्हा स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांचा सन्मान निश्चित राखला जाईल.

जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश सावंत म्हणाले की, येत्या काळात एक महिलांकरीता योजनांचा एक शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही आखत आहोत. जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीची फळी सर्वात भक्कम आहे. प्रत्येक गावाच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये महिला शाखाप्रमुख हे वेंगुर्ला तालुक्यातील १००% बांधणी ला सुरुवात झाली तशी ती दोन्ही मतदार संघात झाली हे कौतुकास्पद आहे. वेंगुर्ल्यात ग्रामीण आणि शहरात महिला आघाडी चे उपक्रम आणि कार्यक्रम सतत चालू असतात त्या बद्दल तालुका संघटक सौ.सुकन्या नरसुले आणि शहर संघटक सौ.मंजुषा आरोलकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

महिला जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत म्हणाल्या की नवीन कार्यकर्त्या सर्वजणींचे स्वागत. गेली चार वर्षे आम्ही न कोणावर टीका टिप्पणी करता आमची रेषा आम्ही वाढवली. आज शिवसेना महिला आघाडी सर्वात भक्कम आहे. जसे संघटन बांधणीचे काम झाले तसे या पुढे सहकार आणि शासनाच्या योजनांचा उपयोग करून महिला सबलीकरण हाच अजेंडा असणार. अनेक अनुभवी महिला कार्यकर्त्या पक्षात आहेत त्यात पोखरणकर मॅडम सारख्या सहकार आणि संघटनेतील कार्यकर्त्या सोबत आल्या त्यांचा निश्चित फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page