सावंतवाडी /-

वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या झुलत्या पुलाच्या बांधकामाबाबत काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांची भेट घेऊन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम आजमितीपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे. आमदार दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करुन दिला असूनही पुलाचे बांधकाम कोणत्या कारणासाठी अपूर्णावस्थेत आहे यासाठी याची खातरजमा करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदारास सक्त ताकीद देऊन झुलत्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, मागणही केली. यावेळी कार्यकारी अभियंता माने यांनी काँग्रेस शिष्टमंडळासमोर संबंधित ठेकेदाराशी संपर्कसाधून ३१ मार्च २०२१ पर्यंत संबंधित झूलत्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, उपाध्यक्ष विजय प्रभू, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page