∆नवरात्र विशेष∆

सुरू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्याला अशा 9 विलक्षण महिलांची ओळख करून देणार आहे, ज्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रातच एक वेगळी ओळख निर्माण केली नाही तर देश आणि समाज यांच्यासमोरही एक अनोखा आदर्श मांडला.

आज आम्ही तुम्हाला 9 महिला न्यायाधीशांविषयी विषयी माहिती सांगणार आहोत ज्यांनी न्याय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

¶ *न्यायमूर्ती अन्ना चांडी* : अन्ना चांडी भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. 1937 मध्ये त्या एका जिल्हा न्यायालयात न्यायाधीश बनल्या. 9 फेब्रुवारी 1959 रोजी केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या अन्ना या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोहोचणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला होत.

¶ *न्यायमूर्ती फातिमा बिवी* : 1989 मध्ये फातिमा बिवी यांची केरळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्या राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या सदस्याही होत्या.

¶ *न्यायमूर्ती सुजाता मनोहर* : 8 नोव्हेंबर 1994 रोजी सुजाता मनोहर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट 1999 पर्यंत चालला. सुप्रीम कोर्टापूर्वी त्या केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.

◆ *न्यायमूर्ती रुमा पाल* : 2000 मध्ये रुमा पाल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंतच्या सर्व महिला न्यायाधीशांपेक्षा प्रदीर्घ काळ कामकाज पहिले.

◆ *न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा* : 30 एप्रिल 2000 रोजी ज्ञान सुधा मिश्रा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. 27 एप्रिल 2014 पर्यंत त्यांनी कामकाज पहिले. त्याआधी त्या झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.

◆ *न्यायमूर्ती रंजना देसाई* : 13 सप्टेंबर 2011 ते 29 ऑक्टोबर 2004 पर्यंत रंजना देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले. त्याआधी त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या.

◆ *न्यायमूर्ती आर भानुमति* : 13 ऑगस्ट 2014 ते 19 जुलै 2020 पर्यंत आर भानुमति यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले.. त्याआधी त्या झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.

◆ *न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा* : 2018 मध्ये इंदु मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. थेट बार कौन्सिल ऑफ इंडियामधून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या. त्यांचा कार्यकाळ 13 मार्च 2021 पर्यंत आहे.

◆ *न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी* : 7 ऑगस्ट 2018 रोजी इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 23 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. अगोदर त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page