गेले चार दिवस करूळ घाटमार्ग होता बंद–

वैभववाडी /-

करूळ घाटमार्ग खचलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप व बॅरेलमध्ये दगड माती टाकून घाटमार्गातून एकेरी वाहतूक सोमवारी दुपार नंतर सुरू करण्यात आली आहे.
गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे रात्री करूळ घाट मार्ग एका बाजूने खचला होता.त्यामुळे करुळ घाट मार्ग धोकादायक बनला होता.गेले चार दिवस करूळ घाट मार्ग बंद होता. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली होती.दररोज रात्रीच्यावेळी घाटमार्गातून मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते.संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय यंत्रणेने 15 ऑक्टोबर पासून घाटमार्ग बंद केला होता.त्यानंतर या घाटमार्ग ची तहसीलदार रामदास झळके,पोलीस निरीक्षक अतुल जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे हिवाळे यांनी पाहणी केली होती.त्यानंतर गेले चार दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने जेसिबी च्या सहाय्याने युद्ध पातळीवर काम सुरू केले होते.
पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडणारा महत्वपूर्ण असा करूळ घाट मार्ग आहे. गेल्या तीन दिवसा पासून करूळ घटमार्गातून जाणारी वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती.
गेले तीन दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी च्या वतीने युद्धपातळीवर खचलेल्या घाट मार्गावर बॅरेल मध्ये दगड व सिमेंटचे पाईप टाकून घाटमार्ग वाहतुकीस तात्पुरता योग्य करण्यात आला आहे.या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हिवाळे यांनी रस्ता वाहतुकीस तात्पुरता सुरू करण्यात आला असल्याचे पत्र पोलीस स्टेशन वैभववाडी व तहसीलदार वैभववाडी यांना दिले आहे.
फोटो: खचलेला करूळ घाट मार्ग तात्पुरता दुरुस्ती करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आहे.छाया:(मोहन पडवळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page