मालवण /-

जिल्हयात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती बागायतीच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानीचि महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आपल्या नावातला थोरपणा दाखवावा.
सिंधुदुर्ग जिल्हयात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशि आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होताना पाहण्यावाचून बळीराजा कडे कुठलाही पर्याय राहीला नाही आहे.शेतीचि बि पेरणी व मशागती करताना आलेल्या कोरोना व्हायरस मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जास्त दराने बियाणे ,खत खरेदी व मजुरी देऊन आधीच आर्थिक खर्चात भरडलेला बळीराजा शेतात तयार उभे असलेले , वाळत टाकलेले पीक पाण्यात कूसत आहे हे हतबल होऊन पाहत आहे अश्या वेळी सरकार मार्फत गांभीर्याने लक्ष देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बळीराजाला तत्काळ नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे जिल्हाच्या आलेल्या पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी या विषयी दुर्लक्ष केले त्यामुळे महसूल मंत्री श्री बाळासाहेब सांवत यांनी विषयात लक्ष देऊन तात्काळ झालेल्या नुकसानीचि पंचयादी करण्याचे आदेश देऊन झालेल्या नुकसानीचि १००% टक्के मदत देण्यास सरकारला भाग पाडावे व या कठीण प्रसंगी बळीराजा सोबत राहून स्वतःच्या नावातला थोर पणा राखावा.अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page