मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून कुडाळ तहसीलदार फाटक यांना देण्यात आले निवेदन..

कुडाळ /-

सरकारने बार उघडे ठेवण्यास परवानगी दि‌ली कारण सरकारच्या‌ तिजोरीचा सवाल होता. मग बारमधे जाणाऱ्या तळीरामांना कोरोनाचा धोका नाही , फक्त मंदिरात जाणाऱ्या भाविकांनाच कोरोना होऊ शकतो का ? सरकारच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रातही प्रतिक्रीया उमटत असताना आज कुडाळ भाजपाही या विषयावर आक्रमक झालेली दिसून आली.

महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावी कारण राज्यामध्ये कोरोना विष्णूच्या काळात लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग आणि शासनाच्या नियमांना अधीन राहून सर्व मंदिरे खुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने कुडाळ तहसीलदार फाटक यांना आज निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष दिपक नारकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, माजी जि प अध्यक्ष सौ. दीप्ती पडते, मोहन सावंत, अजय आकेरकर, योगेश बेळणेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, दिनेश शिंदे, चेतन धुरी, राकेश कांदे, सौ.ममता धुरी, राकेश नेमळेकर, चेतन धुरी, पप्या तवटे, विजय माळकर, निलेश तेंडुलकर, महादेव लाड, चेतन धुरी, वरू राणे, दत्ता गवळी, योगेश घाडी, प्रिंतेश गुरव, प्रसन्ना गंगावणे, तसेच कुडाळ तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page