आचरा /-

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिला जाणारा’मान नेतृत्वाचा सन्मान कतृत्वाचा, आदर्श सरपंच पुरस्कार मालवण तालुक्यातील पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दसरा दिवाळी दरम्याने शिर्डी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात वितरण होणार आहे.

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.कोरोना महामारीच्या काळात राज्यभर सरपंचांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे.शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून ग्रामविकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच मेहनत घेत असतात.

अशा कल्पकतेने काम करणाऱ्या सरपंचांच्या कार्याची तसेच इतर क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घ्यावी,त्यांचा योग्य सन्मान व्हावा या उद्देशाने सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश हि महाराष्ट्रातील सरपंचांच्या हक्कासाठी लढा देणारी संघटना दरवर्षी विशेष कतृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करत असते. या वर्षी आदर्श सरपंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली आहे.आरोग्य समाज भूषण म्हणून अहमदनगरचे डॉ द्वारकानाथ पेरणे, महिला समाज भूषण धुळे येथील सौ सविता कोळी, महिला समाज रत्न पुरस्काराने सातारा कराड येथील सौ सुरेखा वायदंडे, समाजभूषण पुरस्काराने पुणे येथील जया घुगे आदींना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या विशेष कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याना प्राप्त पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page