कणकवली /-

एम.व्ही.डी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ओसरगाव,तालुका कणकवली या महाविद्यालयाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता ओसरगाव तालुका कणकवली येथील एम व्हीं डी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यास केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे.

(7485A) या शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अभ्यास केंद्र सुरू झाले असून पूर्वतयारी , बी.ए बी.कॉम (इंग्रजी व मराठी)माध्यम मान्यता मिळालेली आहे. कुठच्याही व्यक्तीला घरी आपले कामकाज सांभाळून गृहिणी विद्यार्थी सरकारी निमसरकारी कंपन्या मधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना आपली पदवी काम सांभाळून पूर्ण करता येते. बारावी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी परीक्षा देऊन त्यांना प्रथम वर्ष बीए किंवा बीकॉम या पदवीला प्रवेश घेऊन आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करता येईल.त्याचबरोबर जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपलि पदवी शिक्षण बीए मध्ये किंवा वाणिज्य बीकॉम या क्षेत्रात पूर्ण करता येईल.. प्रवेश शुल्कतच अध्ययन पुस्तके दिली जातात.

मुक्त विद्यापीठाची पदवी इतर विद्यापीठांच्या पदवी प्रमाणे समकक्ष आहे. तसेच तो MPSC यासरखा स्परधापरीक्षां देऊ शकतो… इच्छुकांनी विद्यापीठाच्या ओसरगाव तालुका कणकवली येथील येथील अभ्यास केंद्राशी संपर्क साधून प्रवेश घ्यायचा आहे *9022738539* असे आवाहन केंद्र संयोजक सौ. सुप्रिया पवार यांनी केलेले आहे. यावेळी अभ्यास केंद्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री तारी सर यांनी हस्ते झाले झाले.

संस्थे मार्फत कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने याठिकाणी वीवीध विद्यापीठांचे शैक्षणिक उपक्रम सुरु आहेत. कणकवली, ओसरगांव, कसाल या पंचक्रोशीतील शैक्षणिक गरज ओळखून शिक्षणापासून दुर असणाऱ्या किंवा अर्धवट शिक्षण राहीलेल्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी या ऊद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वीवीध अभ्यासक्रम याठिकाणी सुरु केले असे प्राचार्य समीर तारी यांनी सांगितले यावेळी एमव्हीडी इंटरनँशनल स्कुलच्या प्राचार्या मिठारी तसेच महाविद्यालयातील हाँटेल मँनेजमेंन्ट विभाग प्रमुख प्रा.प्रथमेश ठाकूर, बँकींग वीभाग प्रमुख प्रा.रोहीणी गीते आणि श्री.संतोष सावंत सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page