सिंधुदुर्गनगरी /-

राज्यात सध्या चेस दर व्हायरस, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमअंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे 70 टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
या मोहिमेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध माध्यमांचा उपयोग केले जात आहे. यामध्ये कळसुत्री बाहुल्या आणि दशावतार या लोककलांच्या माध्यमातूनही या मोहिमेची प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या मोहिमेमध्ये नेमण्यात आलेली आरोग्य पथके घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी करत आहेत. त्यामध्ये थर्मल गनच्या सहाय्याने टेंम्परेचर तपासणे, ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजनची लेवल तपासणे यासह कोणात इतर काही आजार जसे मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा यासारखे आजार आहेत का याची माहिती घेतली जात आहे. या तपासणीमध्ये काही लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उप जिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जाते. त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येते तसेच कोरोनाचीही तपासणी करण्यात येते. या मोहिमेमुळे राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या संकल्पनेतून जनजागृतीसाठी कळसुत्री बाहुल्या आणि दशावतार या कलांचा वापर प्रभावीपणे करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी के.मजुलक्ष्मी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी या मोहिमे विषयी दशावतार नाटीका सादर केली आहे. तर कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांनी कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम तयार केला आहे.
* सोबत व्हिडीओ जोडला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page