मालवण /-

गेल्यावर्ष भरात जिल्हय़ातील पर्यटन व्यावसाईक नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत दिवाळी मध्ये क्यार वादळ डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिति व गेले सहा महिने कोरोना मुळे जिल्हय़ात पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे , हॉटेल लॉजिग , बोटींग,वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड , टुरिस्ट व्हेईकल यांची आर्थिक स्थिति दननिय झाली असून या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे हा यक्ष प्रश्न या व्यावसाईकांना भेडसावत आहेत .एकमेव पर्यटन जिल्हा असलेला आपला सिंधुदुर्ग येथील स्थानीक व्यावसाईकांनि सरकारी मदत कींवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करून जिह्याचे पर्यटन शेत्रात नाव जगाच्या नकाशा वर कोरले आहे या सर्व विषयी विखुरलेल्या पर्यटन व्यावसाईकांना एकत्र करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही ऑनलाईन माहिती संकलन चालु आहे.
व्यावसाईकांनी https://forms.gle/FNqeVVc3A8uzzk857 या लिंक वर आपली सर्व माहिती भरायची आहे
व्यावसाईकांनि घेतलेली बँकेची कर्जे ,त्यावरील थकीत हप्ते,वाढलेले व्याज,त्यासाठी बँकेची भरण्यासाठी सक्ती, रिसॉर्ट च्या कामगारांचा पगार प्रश्न,चालवायला ज्याने भाड्याने घेतलेलं हॉटेल त्यांची भाडे-डीपॉजिट समस्या,पर्यटन बंद काळातील वाढीव वीज बिले,सि आर झेड कायद्याच्या अडचणी तसेच शासनाने पर्यटन सुरु केले आहे तरी पर्यटक नाहीत , बंद काळातील नुकसानीची भरपाई अशा व अनेक समस्यांवर सरकार ला पर्यटन व्यावसाईकांसोबत येण्यासाठी भाग पाडणे साठी भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी ही ऑनलाईन माहिती पूर्ण पणे भरून अर्ज सादर करावा असे आवाहन जिह्यातील पर्यटन व्यावसाईकांना करीत आहोत अशी माहिती भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री .बाबा मोंडकर यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page