कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८९९ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ३, रानबांबुळी १, ओरोस ५, पिंगुळी १, तेंडोली १, आंब्रड १, तुळसुली तर्फ माणगांव २, बांबर्डे तर्फ माणगांव १, हुमरस १ असे रुग्ण आढळले.

तसेच तालुक्यात ३२९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २७५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५४ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ८९९ तर बरे झालेले रुग्ण ६५० आणि सक्रिय रुग्ण २२४ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २५ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page