वैभववाडी /-

तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मोबाईल व्हाट्सअप वरून अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला आहे .ही घटना 24 एप्रिल 2020 ते 14 जुलै 2020 दरम्यान घडली .या घटनेची नोंद 5 महिन्या नंतर 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजता करण्यात आली.

आरोपी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील हे फिर्यादी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या मोबाईल व्हाट्सअप वरती गेले अनेक महिने वारंवार सेक्सी लूक असा मेसेज पाठवत होते. तसेच तिला वैभववाडी येथील आपल्या ऑफिस मध्ये बोलावून घेऊन तिला आपल्या सोबत गोव्याला फिरायला का येत नाहीस असे बोलून तिच्या हाताला पकडून पाठीवर हात फिरवून जबरदस्ती करण्याचा गेले सहा महिने वारंवार प्रयत्न करीत असत. तसेच महिला डॉक्टरला नेहमी सायंकाळी 5 वाजल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आपले कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर महिला डॉक्टरला मोबाईलवर फोन करून चहा पिण्याच्या निमित्ताने बाहेर किंवा आपल्या जवळ या व मॅगी किंवा चहा बनवून दे असे नेहमी बहाने करून माझ्याशी अश्लील चाळे करत असत याबाबत आरोपीने त् तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांच्याविरोधात कलम 354 दाखल करण्यात आले आहे .या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार प्रीती शिंगारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page