वेंगुर्ला /-

वेंगुर्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त मच्छिमार बांधवानी घेऊन आत्मनिर्भर बना, असे आवाहन आत्मनिर्भर अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी वेंगुर्ले येथे केले .
वेंगुर्ले साईमंगल कार्यालय येथे भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अभियान संवाद कार्यशाळेला मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतीसाद लाभला.यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, अभियानाचे सहसंयोजक विजय केनवडेकर, सावंतवाडी विधानसभा संयोजक एकनाथ नाडकर्णी, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, वेंगुर्ले मच्छिमार सोसा. चेअरमन राजु कुबल, केळुस मच्छी.सोसा. चेअरमन गोविंद केळुसकर, मालवणचे मच्छिमार नेते अशोक तोडणकर, जिल्हा चिटनीस सुधीर दळवी, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे ता.अध्यक्ष बाबा नाईक आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अतुल काळसेकर यांनी मच्छिमारांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना व त्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान याचे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच मच्छिमारांनी आधुनिकीकरणाची कास धरण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचा फायदा घेऊन आपली उन्नती साधली पाहिजे .तसेच शेतकरी गटाप्रमाणे मच्छिमारांनी आपले गट स्थापन करुन शासकीय योजनांचा फायदा घ्यावा व यात महिला भगिनींना सामावून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनेक मच्छिमारांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला .
यावेळी या कार्यक्रमाला नगरसेवक प्रशांत आपटे, शहरअध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सोमनाथ टोमके, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर व समीर चिंदरकर, बुथप्रमुख प्रकाश मोटे व बाळु वस्त व नागेश सारंग , माजी चेअरमन गणपत चोडणकर, ट्राॅलर संघटनेचे बाबी रेडकर, मोहन सागवेकर, अशोक खराडे, रविंद्र शिरसाट, सतीश मोरजे, संतोष साळगांवकर, अनंत केळजी, शांती केळुसकर, बाळकृष्ण हुले, सोमकांत सावंत,गोपाळ बटा,सुधाकर वेंगुर्लेकर, जानुराव चोडणकर, प्रसाद पेडणेकर, भाऊ सामंत ( मालवण),गणेश कुशे ( नगरसेवक – मालवण), नरेंद्र जामसंडेकर ( सर्जेकोट ), संदीप पाटील, सुधीर पेडणेकर, गणेश गावडे, वसंत गावडे आदी सुमारे १०० मच्छिमार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page