वेंगुर्ला /-

भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्वाने ‘आत्मनिर्भर भारत संवाद अभियान’ सुरू केलेले असून शेतकरी,कृषी उद्योग,मत्स्य शेतकरी,मत्स्य व्यावसायिक,लाफहू उद्योजक,फेरीवाले,महिला बचत गट,शेतकरी गट इत्यादी लाभार्थ्यांना आत्मनिर्भर पॅकेजचा लाभ मिळणार,असे प्रतिपादन अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी केले.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर पॅकेज मधील तरतुदी आणि त्याचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्वाने ‘आत्मनिर्भर भारत संवाद अभियान’ सुरू केलेले असून जिल्ह्यात त्याचा शुभारंभ आज ओरोस येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.या अभियानाचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यावेळी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोविड पार्श्वभूमीवर देशाच्या जीडीपी च्या १० टक्के इतक्या मोठ्या रकमेचे म्हणजे २० लाख ५७ हजार कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलेले असून त्यात अंतर्भूत असलेल्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणे सुरू झालेले आहे.यात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ३७ हजार कोटींची,लघु आणि मध्यम उद्योग ( एमएसएमइ) यासाठी ३ लाख कोटी,महिला बचत गटांसाठी १ लाख कोटी,फेरीवाले यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी अशा भरीव तरतुदी आहेत.शेतकरी,शेती,उद्योग,मत्स्य शेतकरी,मत्स्य व्यावसायिक,लघु आणि मध्यम उद्योजक,महिला बचतगट,फेरीवाले,शेती उत्पादक कंपनी किंवा गट तसेच वैयक्तिक स्वरूपात या पॅकेजचा लाभ मिळणार आहे.याची सविस्तर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून यासाठी पात्र असलेल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी या अभियानातून संपूर्ण जिल्ह्याभर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.यावेळी अधिक माहिती देताना काळसेकर म्हणाले की,संकटाचे संधीत रूपांतर करण्याकामी या पॅकेजचा मोठा उपयोग होणार आहे.गेल्या महिन्याच्या देशाच्या आर्थिक प्रगती अहवालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे,ती म्हणजे देशाची निर्यात वाढलेली असून आयात कमी झालेली आहे.व्होकल फॉर लोकल ही संकल्पना आकारास येत आहे.
जिल्ह्यातील संबंधीत नागरिकांना या पॅकेजचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे.सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योजकांना वाढीव भांडवल देण्याचौ योजनेत एकट्या बँक ऑफ इंडिया या बँकेचे ४ हजार ५०० लाभार्थी आहेत, तर इतर बँकांचे मिळून सुमारे १५ हजार लाभार्थी आहेत.७५० हुन अधिक फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.इतर योजनांची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, खरंतर आत्मनिर्भर पॅकेज जाहीर झाल्यानंतर लगेच म्हणजे एप्रिल महिन्यात ‘सिंधु आत्मनिर्भर अभियान’ या नावाने अतुल काळसेकर,डॉ. प्रसाद देवधर आणि प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कामाला सुरुवात झालेली आहे,हळद लागवड,मत्स्यसंपदा, स्लॉटर हाउस,फार्मर प्रोड्युसर कंपनी इत्यादी विषयात चांगले काम झालेले आहे.किसान मोर्चा,उद्योग आघाडी,युवा मोर्चा,महिला मोर्चा यांनी हे अभियान घेऊन लोकांपर्यंत पोचावे.
यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,सरचिटणीस
प्रसन्ना देसाई,जि. प.अध्यक्षा समिधा नाईक,राजू राऊळ,रणजित देसाई,महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, या अभियानाचे सह संयोजक विजय केनवडेकर,कुडाळ विधानसभा संयोजक बंड्या सावंत,सावंतवाडी विधानसभा संयोजक एकनाथ नाडकर्णी,सुप्रिया वालावलकर,गोपाळ हरमलकर,विनायक राणे,विलास हडकर तसेच किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस उमेश सावंत, किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष किशोर नरे, किसान मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष गुरुनाथ पाटील, किसान मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा दिपाली काळे,मच्छिमार नेते दादा केळुसकर, वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक,बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर व इतर सर्व पदाधिकारी व किसान मोर्चा चे मालवण – कुडाळ विधानसभेतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page