मालवण /-

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी डी एस संस्थेमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसाईकांनी आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा लाऊन पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत या साठी अभिनव आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या कठीण प्रसंगात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन व्यावसाईकां सोबत राहून खऱ्या अर्थाने पर्यटन व्यावसाईकांस न्याय द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

दर वर्षी पर्यटन दिनानिमित्त पर्यटन वाढीसाठी सरकारी कुठलीही मदत न घेता संस्थेमार्फत व पर्यटन व्यावसाईकांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात पण या वर्ष भरात जिल्हय़ातील पर्यटन व्यावसाईक नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत दिवाळी मध्ये क्यार वादळ डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिति व गेले सहा महिने कोरोना मुळे जिल्हय़ात पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे , हॉटेल लॉजिग , बोटींग,वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड , टुरिस्ट व्हेईकल यांची आर्थिक स्थिति दननिय झाली असून या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे हा यक्ष प्रश्न या व्यावसाईकांना भेडसावत आहेत .एकमेव पर्यटन जिल्हा असलेला आपला सिंधुदुर्ग येथील स्थानीक व्यावसाईकांनि सरकारी मदत कींवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करून जिह्याचे पर्यटन शेत्रात नाव जगाच्या नकाशा वर कोरले आहे या सर्व विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हय़ाचा पर्यटनांचा आत्मा असलेल्या तारकर्ली ,वायरी, देवबाग,मालवण, तोंडवळी भागातील व्यावसाईक आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा लाऊन आंदोलन केले.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा झेंडे लाऊन निषेध करण्याचा नसून पर्यटन व्यावसाईक आर्थिक संकटात असून सरकारने या व्यावसाईकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोबत यावे हा आहे, असे बाबा मोंडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page