सिंधुदुर्ग /- समील जळवी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CAMPS)जनसुनावणी बाबत सुचना केद्रिय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यानी दि.18 जानेवारी, 2019 रोजी जाहीर केलेल्या नवीन सिआरझेड अधिसुचना, 2019 नुसार सिंधुदुर्ग जिल्हयाचे उक्त पारुप सागरी किनारा,क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने दि 22 जानेवारी, 2020 रोजी https://mEPTLgov.in/ या सकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहेत त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील जनसुनावणी (Digiral Patiorm) व्दारे देणेबाबत संचालक, पर्यावरण विभाग व सदस्य सचिव, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण यानी पत्र क्र. अन्वये निर्देश दिलेले होते.

त्यास अनुसरुन सदरील जनसुनावणी सोमवार दि. 28.09.2020 रोजी सकाळी 1.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.त्याबाबत प्रसिध्दी देण्यात आलेली आहे.सदरील सुनावणीमध्ये (Dicital Platform) व्दारे सहभागी होणेकरीता cisco WEBEX ॲप चा वापर करावा, सदरील अॅप वरुन जनसुनावणीमध्ये सहभागी व्हावे.

सोमवारी होणाऱ्या ई.जन सुनावणी साठी तालुका स्तरावर किमान 300 ते 500 स्थानिक लोक उपस्थित राहतील तसेच जिल्हा स्तरावर किमान 600 ते 800 नागरिक उपस्थित राहणार आहेत.या शिवाय संपूर्ण जिल्ह्यातून 30000 ते 50000 नागरिक लिंक द्वारे ऑनलाईन उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील,फक्त जिल्हा प्रशासनाने नेट connectivity चांगली ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन CRZ जिल्हास्तरीय जनजागृती आणि समन्वय समिती, सिंधुदुर्ग च्या वतीने श्री.नंदन वेंगुर्लेकर यानी केले आहे.अधिक माहिसाठी संपर्क94224 34356

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page