चिपळूण /-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीये. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.उद्धव ठाकरेंच्या गटात असलेले आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घराच्या दिशेनं भिरकावण्यात आलेल्या वस्तू सापडल्या आहेत.

भास्कर जाधव यांच्या घराच्या अंगणात दगड, क्रिकेटचे स्टम्प, पेट्रोल भरलेल्या बॉटल्स सापडल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर चिपळूणमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झालीये.भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी केला आणि कशासाठी केला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञातांकडून आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीये.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

भास्कर जाधव यांचं कुडाळ येथील भाषण चर्चेत असतानाच ही घटना घडलीये. आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीची कारवाई सुरू असून, त्याच्या निषेधार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणेंवर जोरदार टीका केली होती. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून तक्रारही दाखल करण्यात आलीये.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणारच आमदार नितेश राणे

भास्कर जाधव हे सगळीकडे तोंड फुटल्यासारखं बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून बोलायला लागले तर त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच.

कोणावर टीका करायची असेल तर ती फक्त राजकारणापूर्तीच करा पण खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तर कार्यकर्ते रिअॅक्शन देणारच. भास्कर जाधव यांना बोलण्याची सवय आहे तर त्यांनी ह्या देखील गोष्टी सहन करण्याची सवय ठेवली पाहिजे. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page