सावंतवाडी /-
राणे कुटुंबावर बोलण्याची भास्कर जाधव यांची पात्रता नाही.उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलणारे भास्कर जाधव आज त्यांचीच तळी उचलत आहेत.त्यामुळे वाळुचोर भास्कर जाधव यांनी आपली पात्रता ओळखून राणेंवर बोलावं असा जोरदार हल्लाबोल भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे.पुढे संजू परब यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना सांगीतले की,भास्कर परब हे पहिले शिवसेनेत होते आणि ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.उद्धव ठाकरे यांना टीकेतून असे देखील संगितले होते की,उद्धव ठाकरे हे ऐक फोटोग्राफर आहेत.ते फोटोग्राफर आहेत पण त्यांच्याजवळ स्टुडीओ नाही याची आज पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुन्हा आठवण करून दिली.आणि यानंतर राष्ट्रवादीत गेले तिकडे पणं पवार साहेबांना टीका टीपणी करून बाहेर पडले.आणि आता पुन्हा शिवसेनेत आलेले आहेत असे हे भास्कर जाधव सर्वच ठिकाणी उड्या मारणारे माकड आहेत असे सांगितले.
