कुडाळ /-

जगाला शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची, आरोग्याची पर्वणी देणारा, भेट देणारा आंतरराष्ट्रीय योगा दिन बै.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध फॅकल्टी मार्फत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय योग संस्कृतीची व सामर्थ्याची जगभरामध्ये दखल घेतलेली आहे असा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती साठी आवश्यक असणारा योगा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत आहे आणि त्याचं आयोजन करण्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांचा पुढाकार, त्यांचे योगदान दुर्लक्षिता येण्याजोगा नाही.

शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी योगा आजच्या काळात किती महत्त्वपूर्ण आहे हे जगभरातील लोकांना पटलेलं आहे. आणि त्यामुळेच जगभरामध्ये 21 जून हा भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला जातो. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालय ,नर्सिंग महाविद्यालय, महिला व रात्र महाविद्यालय, महिला बी एड महाविद्यालय, सी बी एस सी.ई चे सेंट्रल स्कूल ,जूनियर स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीसाठी चा हा महत्वाचा दिवस विविध योगा प्रात्यक्षिकातून सादर केला . मनाच्या निरोगी आरोग्यासाठी शरीराचं आरोग्य सुद्धा किती महत्त्वाचं असतं याची प्रचिती सोदाहरण देणारा हा योगा दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणात विविध विभागातून साजरा केला गेला. यासाठी चेअरमन उमेश गाळवणकर व डॉ. सुरज शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ,सौ शुक्ला, डॉ.शरावती शेट्टी , डॉ.प्रगती शेटकर, कल्पना भंडारी व त्यांचे सहकारी प्रा अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, अर्जुन सातोस्कर , प्रसाद कानडे, प्रा.प्रथमेश हरमलकर,सौ शुभांगी लोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून योगा डे अतिशय आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला ‌बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page