सावंतवाडी /-

जिल्ह्यात अनेक शाखांमध्ये बँक आँफ ईडियाचे कर्मचारी व अधिकारी कोरोना संक्रमणाची बाधा झालेले आढळल्याने ज्याज्या गावात ब्रँचमध्ये कोरोना बाधित कर्मचारी,अधिकारी आढळले त्या ठिकाणच्या ब्रँच बंद ठेवून ब्रँचमध्ये चौविसतासाच्या आत कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन बॅक आँफ ईडीया क्षेत्रीय कार्यालय, कुडाळ यानी ग्राहकांच्या व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या हितासाठी दक्षता घेतली.

कणकवली ब्रँच,कुडाळ ब्रँच,पाट ब्रँच,दोडामार्ग ब्रँच येथिल बॅक आँफ ईंडीयाच्या शाखांमध्ये व ATM मध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. अचानक बँका बंद ठेवल्यानी अनेक नागरिकांची गैरसोय झाली पण संपुर्ण बँकेत निर्जतुकीकरणाची प्रक्रिया पाहुन नागरीकानीही समाधान व्यक्त केले.बँक आँफ ईंडिया क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी श्री. प्रामाणीक साहेब, श्री.नंदकिशोर प्रभुदेसाई साहेब यानी जातीनीशी प्रत्येक शाखेची दखल घेवून संजू विरनोडकर टिंमच्या त्वरीत कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page