कुडाळ /-

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग गेली काही वर्षे सामाजिक कार्यासोबत दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. दिनांक ५ जून २०२२ रोजी किल्ले सोनगडावरील गड संवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रास्तामार्गे सोनगडावर जाणाऱ्या मार्गावर मार्गदर्शक फलक लाऊन करण्यात आली.

किल्ले सोनगडावर जाण्यासाठी सोनवडे घाट रस्ता, दुर्गवाडी तसेच पवारवाडी मार्गे अशा तीन वाटा आहेत. किल्ले सोनगडावर जाण्याऱ्या वाटांवर दुर्गपर्यंटनासाठी मार्गदर्शक फलकांची आवश्यकता भासत होती. दुर्ग मावळा परिवारामार्फत किल्ले सोनगडावरील दुर्गसंवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रस्ता मार्गे गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शक, महितीदर्शक व सूचना फलक लावून करण्यात आली. पुढील टप्प्यात दुर्गवाडी आणि पवारवाडी मार्गावर मार्गदर्शक, महितीदर्शक तसेच सूचना फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांसाठी श्री दिगंबर विश्राम गुरव (सोनवडे तर्फ कळसुली), श्री आदेशकुमार शाम भगत (फोंडा-गोवा), यशवंत अनंत गावकर (कुपवडे), महेश निकम (शिरशिंगे) यांनी सौजन्य केले.

या फलकांच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी दिगंबर विश्राम गुरव, विश्राम दिगंबर गुरव, भिवा सावंत, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक, सरचिटनिस सुनिल करडे, सामाजिक विभाग प्रमुख समीर धोंड, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद सुतार, कार्याध्यक्ष पंकज गावडे, किल्ले सोनगड संवर्धन प्रमुख सुहास गुरव, मनोहर गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ, मनसंतोष गड संवर्धन प्रमुख नितेश घावरे, विशाल परब, किरण सावंत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page