वेंगुर्ला /-


टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व्हे नं. ३९ मित्रमंडळ यांच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ येथे ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बिच रस्सीखेच चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा होत आहे.या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक, पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, नॅशनल रस्सीखेच संघटनेचे जनरल सेक्रेटरी मदन मोहन, राज्य सचिव गुपिले, या स्पर्धेच्या प्रचार व प्रसारक माधवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.२८ मे व २९ मे रोजी राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा, ३० मे रोजी बक्षिस वितरण खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.संपूर्ण भारतातून २२ राज्य संघ दाखल होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सिंधुदुर्ग रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर व सचिव किशोर सोनसुरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page