कुडाळ /-

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत काव्यरचना करून केली होती बदनामी

कुडाळ :- मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत काव्यरचना करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात व दोन समाजात तेढ व बदनामी कारक अशा मजकुरातुन टीका केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या विरोधात आक्रमक भुमिका घेत कुडाळ पोलिस ठाण्यात धडक दिली.व या प्रकरणी केतकी चितळे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी फिर्याद दिली.या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात केतकी चितळे यांचेवर गुन्हा दाखल आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, उत्तम सरापदार, नजीर शेख, सा.बा.पाटकर, संग्राम सावंत, प्रशांत पाताडे, प्रतिक सावंत, सर्वेश पावसकर आदी राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या फिर्यादी मध्ये नमुद करण्यात आले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केतकी चितळे या विकृत महिलेने कवितेतून उद्गार काढुन जे काही मतप्रदर्शन केलं, त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल हे सुद्धा तिचा हेतू होता, यापुढे तरी या दोन समाजामध्ये तेढ व्हावी आणि समाजात अशांतता पसरावी या विकृत हेतूने ही सर्व प्रकारची खालच्या पातळीला जाऊन कविता करण्यात आलेली होती आणि यांच्यासाठी म्हणून तरी ही प्रवृत्ती थांबवावी या एकाच हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केतकी चितळे यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे.

यावेळी अमित सामंत यांनी सांगितले की, कुडाळ पोलीस स्टेशन येथे चितळे हिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आम्हाला खात्री आहे की लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस तिला अटक करून येथे घेऊन येतील व पुढील तपास करतील असे सांगितले. या तक्रारीची कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दखल घेत अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली व या प्रकरणी अधिक तपास करण्यात येईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page