मुंबई /-

कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून येथील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा तसेच पर्यटनाच्या सुविधा आदी प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली. स्थानिक पातळीवर भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेशही ठाकरे यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक घेतली.  बैठकीत त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, भिवंडी, पालघर येथील स्थानिक परिस्थितीची माहिती लोकप्रतिनिधींकडून घेतली. या बैठकीला मुंबईसह कोकणातील १४ आमदार उपस्थित होते. कोकणातील विकासात्मक कामांसंदर्भात ही बैठक होती. येथील प्रकल्प तसेच स्थानिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदारांची मते जाणून घेतली.त्याचप्रमाणे आवश्यक त्या योजना राबविण्याचे आदेश  मुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page