वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व व्हाईस चेअरमनपदी भाजपाचे खानोली गावचे उपसरपंच सुभाष खानोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी कावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्य.सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनलने पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले व विरोधकांचा दारुण पराभव केला होता.१३ पैकी १२ जागा जिंकून सोसायटीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते.चेअरमनपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करत आपले वर्चस्व कायम राखले.
या निवडीनंतर भाजपाच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी नूतन चेअरमन प्रशांत खानोलकर व व्हा.चेअरमन सुभाष खानोलकर व अन्य सदस्य यांचे अभिनंदन केले.तसेच खानोली ग्रा.पं. सरपंचा प्रणाली खानोलकर यांनीही त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हा का.का.सदस्य रामकृष्ण उर्फ बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, प्रभारी ज्ञानेश्वर काळजी, पॅनलप्रमुख महेश प्रभुखानोलकर, माजी चेअरमन मधुकर खाडे व प्रसाद प्रभु, सिद्धेश्वर प्रभुखानोलकर, बुथप्रमुख बाळु खानोलकर, सुनील घाग, संजु प्रभु, रत्नाकर खानोलकर,तसेच सदस्य – शामसुंदर मुननकर, विलास सावंत, नाना कोळेकर, निता कोळेकर, भाई खानोलकर, महेश कांबळी, विजय सातार्डेकर, संतोष खानोलकर, अनंत प्रभु व  रत्नप्रभा खानोलकर, पोलिस पाटील धोंडु खानोलकर, सुनिल सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page