सिंधुदुर्ग/-

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर येथे दि.१० मार्च २०२० रोजी रात्री ८-१५ च्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ संशयित आरोपींनी बेकायदा जमाव करून फिर्यादीस हाताच्या थापटानी, व लाथाबुक्क्यांनी, चप्पलाने मारहाण केली व सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले.अशी तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. याबाबत तपास सुरू असताना पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धांत बांदेकर,युवराज उर्फ संकेत पिसे, सूरज आनंद मेस्त्री,ऐश्वर्या बांदेकर सर्व रा.कुडाळ,आणि खतीजा शेख रेडकर रा. सावंतवाडी यांना अटक करून त्यांचे विरुद्ध ओरोस येथील मे.विशेष न्यायालयात अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारित कायदा २०१५ चे कलम ३(१)(r)(s) सह भा. द वि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ या गुन्ह्याखाली दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.सदर केसच्या कामी सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले होते. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपी तर्फे वकील श्री विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन ओरोस येथील मे.विशेष न्यायालयाने संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.यावेळी संशयित आरोपींच्यावतीने ॲड.विवेक मांडकुलकर,ॲड.प्रणाली मोरे, ॲड.भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड.प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page