सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा कोरून विषाणू शिरकाव करताना दिसत आहे.कोरोनाचा करण्यात आलेल्या १९ नमुने चाचणीमध्ये एक अहवाल बाधित आला आहे. हा रुग्ण कुडाळ तालुक्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण सक्रिय संख्या तीन झाली आहे.दोन वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा ८ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला होता. मात्र, १३ एप्रिल रोजी तीन रुग्ण मिळाले होते. हे रुग्ण २० एप्रिल रोजी बरे झाल्याने जिल्हा पुन्हा कोरोनामुक्त झाला होता. पण त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी दोन रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यात पुन्हा सक्रिय रुग्ण झाले होते. आज पुन्हा एक रुग्ण मिळाल्याने सक्रिय रुग्ण तीन झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३० हजार ८६० एवढ्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यातील ५७ हजार ३८५ नमुने कोरोना बाधित आले आहेत. बाधित पैकी ५५ हजार ८५० रुग्ण बरे झाले आहेत. तर १५३२ रुग्णाचे उपचार घेत असताना दुर्दैवी निधन झाले आहे. एकूण मिळालेल्या रुग्णांमध्ये देवगड ६,९४२, दोडामार्ग ३२२०, कणकवली १०६११, कुडाळ ११८६४, मालवण ८२५४, सावंतवाडी ८५०५, वैभववाडी २५६२, वेंगुर्ले ५१०८ तर जिल्ह्या बाहेरील ३१९ अशाप्रकारे रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत मृत्यू झालेल्या १५३२ रुग्णांमध्ये देवगड १८५, दोडामार्ग ४७, कणकवली ३२१, कुडाळ २५४, मालवण ३००, सावंतवाडी २१७, वैभववाडी ८३, वेंगुर्ले ११६, जिल्ह्याबाहेरील ९ अशाप्रकारे रुग्णाचा समावेश आहे. एकूण बाधित रुग्णांत आरटीपीसीआर टेस्टमध्ये ४१ हजार १७१ नमुने तर अँटीजन टेस्टमध्ये १६ हजार ४२५ रुग्ण बाधित मिळाले आहेत. आज नव्याने १९ नमुने तपासण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page