कुडाळ /-

संत राऊळ महाराज महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती व्याख्यानाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. सदर व्याख्यानाचे आयोजन हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. प्रमोद जमदाडे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.

या प्रसंगी प्रा.प्रमोद जमदाडे यांनी यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी तसेच समाजातील उपेक्षित जाती-जमाती व स्त्रिया यांना समान हक्क अधिकार देण्याविषयी केलेल्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला.महापुरुषांनी समाज पुनरुत्थानासाठी केलेले कार्य हे आपण विसरता कामा नये तसेच युवकांनी त्यांच्या कार्यातून आदर्श समाज निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले हे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी वर्षभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्वयंसेवक विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. इश्वरी कुडाळकर हिने केले. प्रास्ताविक कु. संचना सिंगनाथ तर आभार प्रदर्शन वेदांत सावंत याने केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय हा कु. श्रावणी साळगांवकर हिने केला.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा.उमेश कामत, कार्यक्रम अधिकारी प्रा. सबा शहा, डॉ. कमलाकर चव्हाण, नॅक समन्वयक डॉ. व्ही. बी. झोडगे, एन.सी सी. विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ.एस. टी.आवटे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. व्ही.जी. भास्कर, महिला विकास कक्षाच्या डॉ. शरयू असोलकर तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page