कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अखेर शिवसेनेचा विरोध डावलून भाजपचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची निवड झाली या निवडी दरम्यान शिवसेनेने घेतलेल्या हरकती वर एड. सुहास सावंत यांनी युक्तिवाद करून माजी नगरसेवक गणेश भोगटे यांचा अर्ज वैद्य ठरविला.

कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक मंगळवार १२ एप्रिल रोजी नगरपंचायत कार्यालय येथे संपन्न झाली या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्याधिकारी नितीन गाढवे उपस्थित होते कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक काही महिन्यापूर्वी झाली होती यामध्ये भाजप कडून गणेश भोगटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र यावेळी हा अर्ज अवैद्य ठरला होता त्यानंतर पुन्हा या पदासाठी निवडणूक आज मंगळवार १२ एप्रिल रोजी यांनी जाहीर केले या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून गणेश भोगटे यांचा उमेदवारी अर्ज भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी पुन्हा अर्ज दाखल केला.

उमेदवारीवर वकीलांमध्ये झाला युक्तिवा

भाजप पक्षाकडून माजी नगरसेवक गणेश भोगटे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकृत नगरसेवक का साठी दाखल केल्यानंतर महा विकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या अर्जावर हरकत घेतली गणेश भोगटे यांचा यापूर्वी अर्ज अवैध ठरला होता आता ज्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अर्ज दाखल केला आहे त्या संस्थेची कागदपत्रे बोगस आहेत तरी त्यांची उमेदवारी अर्ज फेटाळावा अशी मागणी महाविकास आघाडी मार्फत एड. सुनील लोट यांनी पीठासीन अधिकारी यांच्याकडे केली याबाबत भाजप पक्षाकडून अडवोकेट सुहास सावंत यांनी सांगितले की एखादा उमेदवार कितीही सामाजिक संस्थेमध्ये काम करू शकतो आणि नियमात असे कुठेही म्हटलेले नाही ही कागदपत्रे बोगस किंवा चुकीची असतील तर धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तुम्ही हरकत नोंदवू शकता त्यासाठी हे पीठासीन अधिकारी न्यायालय नाही असे सांगितले.

अखेर निवड निश्चित झाली

भाजप आणि महाविकास आघाडी कडून दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर पीठासीन अधिकारी यांनी सांगितले की स्वीकृत नगरसेवक पदासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत या त्याची पूर्तता उमेदवारांकडून केली गेली आहे त्यामुळे गणेश भोगटे यांचा अर्ज वैध ठरवीत आहे असे सांगितले त्यामुळे शिवसेनेने विरोध केला मात्र हा विरोध टिकला नाही अखेर गणेश भोगटे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड निश्चित झाली.

भाजपच्या गोटात एकच जल्लोष

स्वीकृत नगरसेवक पदी माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची निवड निश्चित झाल्याचे समजतात भाजपच्या गोटात एकच जल्लोष साजरा झाला यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, वरू राणे, राजेश पडते, चंदन कांबळी, आनंद लाड, चेतन पडते,निलेश शिरसाट शिरसाट,प्रथमेश कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घेतला आशीर्वाद

स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यानंतर गणेश भोगटे यांनी सर्व नगरसेवक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन पडवे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की जोमाने कामाला लागा आणि शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page