कणकवली /-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात कधी ही व्यसनांचे सेवन केले नाही. तीच गोष्ट शिवाजी महाराजांची -महात्मा फुलेची. व्यक्तीने निर्व्यसनी जीवन जगले पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही होते. यासाठी धम्म दिक्षा देतांना त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांपैकी 17 वी प्रतिज्ञा म्हणजे मी दारू पिणार नाही. जो धम्म स्वीकारला त्या बुद्ध वंदनेतही जे पंचशील आहे त्यातील पाचवे शिल निर्व्यसनी राहण्याचा आचार -विचार सांगतो. परंतु आज समाजाची परिस्थिती पूर्णपणे विपरीत आहे.

त्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्गने एक सकारात्मक आणि कृतिशील उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवनंदना देण्याचा संकल्प केला आहे. हे अभियान 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते 16 मे तथागत भगवान बुद्ध जयंती पर्यंत राबविले जाणार असून यात प्रचार -प्रसार -प्रबोधन अभियानाचा मानस आहे. कणकवली येथील बुद्ध विहार प्रांगणात दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग यांच्या जय भिम महोत्सव 2022 या कार्यक्रमात व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तरी या लोकउपयोगी -आरोग्यदायी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेचा प्रचार व अंमलबाजणी करणाऱ्या अभियानात सामिल होऊन बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन नशाबंदी मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page