कुडाळ /

कोकणचे भाग्य विधाते तथा कोकण सुपुत्र तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७० वा वाढदिवस उद्या, १० एप्रिल २०२२ रोजी भाजप सिंधुदुर्ग आणि भाजप युवानेते विशाल परब मित्रमंडळातर्फे ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात साजरा होणार आहे.त्यानिमित्ताने कुडाळ भाजप कार्यालय समोरील पटांगणावर जंगी तिरंगी बारी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या तिरंगी बारीचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन भाजपच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात भाजप सिंधुदुर्ग आणि भाजप युवानेते विशाल परब मित्रमंडळातर्फे शाळा, सामाजिक संस्था, आश्रम येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा होईल.तर उद्या सिंधुदुर्गनगरी येथील शरद भवन येथे संध्याकाळी ठीक ४.३० वाजता कोकणचे सुपुत्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विशेष वाढदिवस सोहळा आयोजित केला आहे.

यावेळी राज्यातील भाजप नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, भाजप राज्य सरचिटणीस निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित असतील. यानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील शरद भवनच्या हॉलचा आज सकाळी जिल्ह्याचे भाजप नेते आणि युवानेते विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आढावा घेतला. उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिनास जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवानेते विशाल परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page