सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी शासनाचा महसूल वाढवा या हेतूने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रास देत आहेत. आज सावंतवाडी तालुक्यात अनेक दगड खाणी जांबा दगड हे अनधिकृतपणे 500 ब्रास परमिशन घ्यायचे आणि 1000 ब्रास उत्खनन करायचं त्याला दंड करत नाही. मुळात आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येक जण आपली जी तुटपुंजी वडिलोपार्जित शेत जमीन आहे त्या ठिकाणी घर बांधतो, परंतु अजून पर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक रस्ते पूर्वी 26 नंबर आता 23 नंबर रेकॉर्डला नाही आहेत. आपला सावंतवाडी तालुका हा गावठाण क्षेत्रात नाही. आम्ही यासंदर्भात तत्कालीन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांना लेखी पत्रव्यवहारही सरपंच संघटनेच्या माध्यमातून केला. त्यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यामुळे फक्त परवानगीसाठी ना हरकत दाखला ग्रामपंचायत देते .परंतु शासनाच्या अटी शर्ती आहेत, त्या खूप आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या पूर्ण करणे शक्य नाही त्याचप्रमाणे नगररचना खात्याकडे अर्ज करूनही किती जणांच्या अर्जांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्वसामान्य जनतेसोबत आहे. आपण सावंतवाडी तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच व ग्रामसेवक यांची माननीय गटविकास अधिकारी यांच्यासमवेत दिनांक 20 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली असून आपण या बैठकीला उपस्थित रहावे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विनंती करीत आहे. आपण जो दंड आकारला त्याबाबत आपले मंडळ अधिकारी व तलाठी यांना वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना आपण आपल्या स्तरावर द्यावेत ही विनंती असं निवेदनही त्यांनी दिले यावेळी मनसेचे नेमळे शाखाध्यक्ष बाबुराव राऊळ, मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब, सचिन मुळीक, राकेश राऊळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page