ओरोस /-

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण मेढा येथील फ्रान्सिस बस्त्याव रेबेलो (वय ७०) याला १० वर्ष सश्रम कारावास, साडेतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश आर बी रोटे यांनी सुनावली आहे. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.

१२ ऑगस्ट २०१८ रोजी हा गुन्हा घडला होता. याबाबत १३ ऑगस्ट २०१८ मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी आरोपी फ्रान्सिस रेबेलो याना अटक करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रेश्मा मोमीन यांनी तपासीक अंमलदार म्हणून काम पाहिले होते. या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. यासाठी न्यायालयाने एकूण १० साक्षीदार तपासले. यात पीडित मुलीची आई, डॉक्टर व तपासीक अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.

भादवी कलम ५११ अन्वये दहा वर्षे सक्त मजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. ५०४ अंतर्गत एक वर्ष सक्त मजुरी, ५०९ अंतर्गत एक वर्ष साधी कैद, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अंतर्गत तीन वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे.00 आरोपी फ्रान्सिस रेबेलो अटक झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेली साडेतीन वर्षे वगळता उर्वरित साडे सहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आरोपी फ्रान्सिस रेबेलो यांना भोगावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page