कणकवली /-

आयनल सोसायटीच्या निवडणुकीत माजी सभापती भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम यांच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलचा शिवसेना प्रणित गाव विकास पॅनेलने धुव्वा उडवित १२ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत युवासेनेचे भाई साटम किंगमेकर ठरले आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत रावजी सोनू चिंदरकर (७३ मते), उत्तम ओटवकर (६८ मते), मनोहर चव्हाण (७१ मते), सुशांत चव्हाण (७१ मते), सुरेश मुणगेकर (७१ मते), विष्णू हडकर (७३ मते), अरविंद ओटवकर (६७ मते), भास्कर लोके (७२ मते) हे उमेदवार सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर महिला प्रतिनिधी गटातून सौ. गीता धनाजी चव्हाण (७४ मते), सौ. संगीता सुरबा चव्हाण (७३ मते) या विजयी झाल्या आहेत. इतर मागास वर्गातून सुधीर देवू लाड (७३ मते) तर अनुसूचित जाती जमाती गटातून प्रकाश सावळाराम सावंत यांना सर्वाधिक (७७ मते) मिळवत ते विजयी झाले आहेत. या विजया करिता शिवसेना प्रणित गाव पॅनेलच्या वतीने अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश चव्हाण, विलास हडकर, भगवान मसुरकर, साईनाथ ओटवकर, दशरथ दहीबावकर, आदेश ओटवकर, संदीप घाडी, मधुकर पडवळ, प्रवीण चव्हाण, दिपक मेस्त्री, यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडून आलेल्या संचालकांचे माजी जिल्हा बँक अध्यक्ष, शिवसेना नेते सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गौरीशंकर खोत यांनी अभिनंदन केले. तसेच सोसायटी निवडणुकीचे प्रमुख शिलेदार प्रविण उर्फ भाई साटम यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी उद्योजक रामू विखाळे, उपविभागप्रमुख तात्या निकम,भाई सदडेकर आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच आयनल ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page