वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यात आज बुधवार २३ मार्च रोजी सायंकाळी शहर भाग वगळता काही ठिकाणी ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला.वातावरणात झालेल्या बदलामुळे आज पावसाचे वातावरण तयार झाले होते.वेंगुर्ले शहरातील राऊळवाडा येथील सातेरी व्यायामशाळेजवळच्या वटवृक्षावरील वटवाघळांच्या विष्ठेमुळे पावसामुळे वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता असल्याने 
शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी वेंगुर्ले नगरपरिषद अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने रस्ता स्वच्छ धुवून घेतला.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबाबत नागरिक व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.मात्र तालुक्यातील अन्य भाग वगळता आडेली,वेतोरे, मठ या भागात सायंकाळी सुमारे अर्धा ते एक तास मुसळधार अवकाळी पाऊस झाला.शहरात व ग्रामीण भागात अन्य बहुतांशी ठिकाणी तुरळक पाऊस झाला.गेल्या काही दिवसात उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती व वातावरणात बदल झाला होता.दरम्यान ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदार आणखीनच चिंताग्रस्त झाला असून गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही वैरण भिजल्याने आणखीनच आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page