वेंगुर्ला /


रुग्णसेवा साहित्य सेवा केंद्र ही जनसामान्यांची सेवा करण्याचे माध्यम आहे. मकरंद पाटणकर यांनी आईच्या स्मरणार्थ दातृत्व भावनेतून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णसेवा साहित्य केंद्रामुळे वेताळ प्रतिष्ठानच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमांच्या माळेत समाजकार्याचा अजून एक मणी गुंफला गेला.सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत अविरत चालू ठेवा, असे प्रतिपादन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सावंतवाडीचे डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी तुळस येथे केले.तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर स्मृती रुग्णपोयोगी साहित्य सेवा केंद्र लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमांचे अध्यक्ष दादासाहेब परुळकर, स्वागताध्यक्ष मकरंद पाटणकर,तुळस ग्रा.पं.सरपंच शंकर घारे, माजी पं.स.सभापती यशवंत परब,उपसरपंच सुशील परब, ग्रा. पं. सदस्य जयवंत तुळसकर, शितल नाईक,सोनू आरमारकर, प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस चे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. पवार, डॉ. संतोष कुडतरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर,अरविंद गोरे,पूजा भणगे आदी उपस्थित होते.सर्वसामान्य लोकांना अपघात किंवा आजारी व्यक्तीसाठी थोड्या कालावधीकरिता आवश्यक साहित्य घेणे परवडत नाही आणि सहज उपलब्ध होत नाही ही गावातील समस्या लक्षात घेऊन या आपल्या कै. आशा पाटणकर आईच्या स्मृती प्रित्यर्थ  मकरंद पाटणकर यांनी दातृत्व भावनेतून रुगणोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले असून,वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर स्मृती रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्राचा आज रविवारी डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी  गावातील सर्वसामान्य जनतेला आता  सदर सेवा केंद्राच्या माध्यमातून अडचणीच्या काळात साहित्य सहज उपलब्ध होणार असल्याच्या भावनेने आणि तुळस गावासाठी सोनेरी क्षण असा उल्लेख करत सरपंच घारे यांनी पाटणकर  याचे  ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले. पाटणकर यांनी सदर रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्राकरीता शितशवपेटी, वॉटर व एअर बेड, फॉवलर व सेमी फॉवलेर बेड, व्हील चेअर, स्ट्रेचर, कुबड्या, वॉकर, कमोड चेअर असे रुग्णपयोगी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.  त्यांच्या या दातृत्वा बद्दल व रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्र च्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रतिष्ठानच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.
तसेच सदर रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्र जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आले असून गरजुंनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page