कुडाळ /-

काही मोजक्या पदाधिकांऱ्यांना बोलावुन काल बडतर्फ गावडे यांनी तालुका बैठकीच्या नावाखाली घेतलेली बैठक आणि ठराव पुर्णता बेकायदेशीर आहे.तालुका बैठक बोलावताना बैठकीचे निमंत्रण तालुक्यातील सर्व पदाधिकांऱ्यांना दिले नाही. यावरुन बैठकीच्या आयोजनाचा हेतूच दिसून येतो. काही लोकांना फोन करुन दोन मिनीटांसाठी या फक्त सही करुन जा. असे सांगण्यात आले होते. जर सर्वांना निमंत्रण दिले असते तर सर्व पदाधिकारी बैठकीला हजर राहून त्यांनी आपले मत मांडले असते. बडतर्फ गावडेंनी इतर लोकांना कशासाठी बोलाविले आहे. हे समजताच माहीती घेण्यासाठी मी बैठक स्थळी गेलो. बैठकीबाबत विचारणा केली कसली बैठक आहे? कशासाठी बैठक बोलावली? त्यावेळी तेथे नुसत्या सहया घेण्याचे काम सुरु होते. आमच्या विचारनेनंतर लगेचच “बैठक संपली”, “बैठक संपली” असे सांगून ठराविक पूढाऱ्यांनी तेथून पळ काढला. तेथील लोकांना विचारले असता हि बैठक कशाची होती हे आपल्याला माहीतच नाही असे उपस्थिंतानी सांगीतले.


त्यामुळे घरी जावुन लिहीलेल्या ठरावाला किंमत काय? गावडे यांना राजकारणात पक्ष शिस्त, पक्षाची घटना, याचा कदाचित अनुभव कमी असल्याने ते पक्षाच्या घटनेत जिल्हाचा प्रमुख असणाऱ्या जिल्हाध्यक्ष पदाविरोधात त्यांच्या निर्णयाविरोधात अनैसर्गिक ठराव घेतात. हा अज्ञानाचा प्रकार म्हणावा का? आर टी आय खाली माहीती मागणे येवढे सोपे काम पक्षाचा अधिकृत ठराव घेणे नाही. याची समज असणे गरजेचे आहे.

मुळात जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली १०/०३/२०२२ रोजीची बैठक अधिकृत होती. बैठकीचे निमंत्रण तालु्क्यातील सर्व पदाधिकारी मनसैनीकांना आगाऊ चार दिवस सोशल मिडीया, वॅाटस्ॲप ग्रुप, व्यक्तिगत संदेश व फोन कॅाल या माध्यमातून निमंत्रीत केले होते. मात्र या बैठकीला स्वतः गैरहजर राहून तालुका बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि केलेल्या कार्यावाहीवर माध्यमातून विरोधी प्रतिक्रीया देणे हा पक्ष शिस्त व पक्षाचा अवमान ठरतो. जिल्हाध्यक्ष यांनी चार पानांचे लेखी पत्र पंधरा कारणांवर आधारीत वरिष्ठांना दिले आहे. वरिष्ठांना यावर लेखी स्वरुपात अभिप्राय, मार्गदर्शन मागीतले आहे. तो लेखीस्वरुपात अभिप्राय जिल्हाध्यक्षांना प्राप्त झाल्यावर जिल्हाध्यक्ष आपला निर्णय जाहीर करतील तो सर्व स्विकारतील.


त्यामुळे असं घरगूती ठरावावरती पक्ष संघटना चालत नसते. चार माणसे बोलावून त्यांच्या सहया घेवून ठराव अमलात आणायला पक्ष संघटना म्हणजे सांस्कृतीक कार्यक्रमात नाचण्या येवढे सोपे नाही…. स्वतःच खंर न करता चार जाणकार व्यक्तिंचे मार्गदर्शक त्यांनी सदर विषयी घ्यावे.जिल्हाध्यक्ष हे जिल्हातील सर्वेाच्च पद आहे. त्यांनी केलेल्या कारवाई संदर्भात लेखी उत्तर येईपर्यत थांबणे आवश्यक होते. कारवाई दरम्यान फक्त प्रभारी तालुकाध्यक्ष पद जाहीर केले आहे. त्यासाठी अनावश्यक खटाटोप कशासाठी? याचा विचार करणे गरजेचे आहे. जिल्हाध्यक्षांनी लेखी अहवाल वरिष्ठांना दिला आहे. त्यामुळे वरिष्ठांशी फोन वर चर्चा केली असे सांगून माध्यमांना चुकीच्या बातम्या देवून प्रसिध्दी मिळवणे योग्य नाही. त्यामुळे तालुका बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय होईपर्यत जिल्हाध्यक्षांच्या सहीच्या पत्राप्रमाणे मी प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन वरिष्ठ मा. सरचिटनीस जी.जी उपरकर व मा. जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या पदाचे कर्तव्य बजाविन तूर्तास या विषयावर प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन येवढेच बोलेन.वरिष्ठ निर्णय होई पर्यत प्रसार माध्यमांना याविषयी कोणतीही प्रतिक्रीया या पुढे देणार नाही.सखाराम उर्फ सचिन सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page