वेंगुर्ला /-

आडेली आंबेडकरनगर या वाडीच्या विकासासाठी शासन दरबारी लागेल ती मदत तसेच अपूर्ण राहिलेली कामे यांचा त्वरित पाठपुरावा करून ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आडेली येथे दिले.यावेळी येथील नादुरुस्त असलेले समाजमंदिर,तसेच आडेली आंबेडकरनगर ते स्मशानभूमी रस्त्याच्या उर्वरित काम पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्यात येईल,असे सांगितले.वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथील बौद्ध वस्ती सुधारणा अंतर्गत शासनाच्या निधीतून २०१९ -२२ या वर्षाकरिता जो निधी मंजूर झाला, त्या निधीतून आंबेडकरनगर रहिवासी यांना वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आली.आडेली ग्रामपंचायतच्या वतीने दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर निधीतून घर तेथे नळ कनेक्शन या योजनेतून ४३ नळकनेक्शन देण्यात आली.या नळकनेक्शनचे लोकार्पण समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी समाजमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आडेली ग्रा.पं. सरपंचा प्राजक्ता मुंड्ये, सोमेश्वर सोसायटीचे चेअरमन समिर कुडाळकर,पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, ग्रा.पं.सदस्य विष्णू कोंडसकर,कृषी सहाय्यक लाडू जाधव,सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत, ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण, उत्कर्ष कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष उदय आडेलकर, उपाध्यक्ष किशोर आडेलकर, प्रशांत मुंड्ये, यशवंत परब, बाबा घोंगे, बाबा टेमकर, फकरी आडेलकर, स्वप्नील धर्णे,तानाजी आडेलकर ,स्वप्निल आडेलकर, रामदास आडेलकर, बाबुराव  आडेलकर,संतोष आडेलकर, गोविंद आडेलकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी नळयोजना राबविलेल्या विहीरीसाठी लागणारी दोन गुंठे जमीन ही माजी पोलिसपाटील पांडुरंग राजाराम आडेलकर यांनी विनामोबदला ग्रामपंचायत च्या नावावर केली.यावेळी अंकुश जाधव यांचा पांडुरंग आडेलकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी सहकार्याबद्दल समिर कुडाळकर व उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल स्वप्निल धर्णे यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक चंद्रकांत आडेलकर यांनी,मान्यवरांचे स्वागत रमेश आडेलकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार उदय आडेलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page