कुडाळ /-

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला विकास कक्ष आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड.सौ. नीलांगी रांगणेकर सावंत उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस डी डिसले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. व्ही.बी.झोडगे कॅप्टन डाॅ.एस.टी. आवटे प्रा.यू एम कामत डॉ डी.जी चव्हाण डॉ.शरयू आसोलकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना अॅड. नीलांगी रांगणेकर सावंत यांनी आजच्या स्त्रीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे त्यासाठी विविध कायद्यांची मदत घेतली पाहिजे मात्र स्वतः कणखर होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.यावेळी बोलताना त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील महिलाःविषयक कायद्याची महिलांविषयक कायद्याची वाटचाल सविस्तर आणि उदाहरण सहित विशद केली.आपल्या वकिली पेशातील आजवरच्या अनेक अनुभवांचे कथनही केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस
डी.डिसले यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजात वावरताना स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड ठेवू नये. समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी महिला विकास कक्षाने घेतलेल्या आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे प्रकल्प अहवाल आणि विस्तार उपक्रमांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका सिद्धी गोसावी हिची राज्यस्तरीय युवा पार्लमेंट साठी निवड झाल्याबद्दल आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाची कु. दिव्या नाईक हिची उत्कृष्ट छात्रा म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक योगिता वाईरकर यांचा सेट परीक्षेतील सुयशाबद्दल सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देणारे पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच लिंगभाव समानता या संकल्पनेवर सुंदर रांगोळी रेखाटली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. ऋतुजा वंजारे हिने केले. कु. सिद्धी लाड याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. डॉक्टर आवटे यांनीही विचार मांडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर शरयू आसोलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु. श्रावणी साळगावकर हिने केले. या कार्यक्रमाला डाॅ.व्ही जी.भास्कर, प्रा.पी.डी. जमदाडे,प्रा.प्रज्ञा सावंत,प्रा.संतोष वालावलकर प्रा.स्वप्ना चांदेकर,प्रा.सबा शहा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page