कणकवली /-

कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार राज्याच्या महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी मराठा मंडळ कणकवली येथे बोलताना काढले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा
महिला मेळावा नुकताच महिला तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाला.महिलांनी सुरेल आवाजात वसुंधरा गीताचे स्तवन केले. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचे सन्मानगीत गायन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी राज्य महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नितीन कदम, राज्य महिला सल्लागार सुरेखा ताई कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, प्रवक्ते सुनिल चव्हाण, शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, शिक्षक बँक उपाध्यक्षा निलम बांदेकर, संचालक आनंद तांबे, शरद केनवडे, कुडाळ महिला अध्यक्षा संगिता राऊळ, कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव J कणकवली तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, महिला तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर, महिला तालुका सचिव नेहा मोरे, माजी अध्यक्षा वृषाली सावंत, माजी सचिव रश्मी आंगणे, सुजाता टिकले, कल्पना मलये, निलेश ठाकूर, पियुषा प्रभूतेंडुलकर, मालवण तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, शशांक आटक, साटविलकर, श्रीकृष्ण कांबळी, महेंद्र पवार, सानिका मदने, संदीप गोसावी, टोनी म्हापसेकर, सिने अभिनेते अभय खडपकर, सुप्रिया म्हसकर, ऋजुता जंगले, गजानन टक्के, गुलाब कुवर प्रकाश झाडे, सोमनाथ शेंगाळ, सत्यवान घाडीगांवकर, संतोष तांबे, पत्रकार मयूर ठाकूर, अमित हर्णे, गंगावणे, सिने अभिनेते दिनेश पाटील प्रतिभा कोतवाल, पुजा शंकरदास, राजा कडुलकर, स्वराशा कासले, प्रियांका सावंत, रुपेश गरुड, महिला मदत केंद्राच्या रोजा खडपकर आणि तालुक्यातील तमाम महिला शिक्षिका व शिक्षक शिलेदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page