वेंगुर्ला /-


वेंगुर्ले शहरातील जनतेशी अत्यावश्यक शासकीय कार्यालयांचे मार्गदर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत,अशी मागणी वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वेंगुर्ले तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सचिव नम्रता नितीन कुबल यांनी वेंगुर्ले नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की,वेंगुर्ले शहरात तालुक्यातील अतिमहत्वाची व जनतेशी विविध कामांच्या बाबतीत निगडित असलेल्या शासकीय कार्यालयांचे मार्गदर्शक फलक संबंधित विभागाकडून आजपर्यंत लावण्यात आलेले नाहीत.त्यामुळे ही कार्यालये शोधताना संबंधित नागरिकाना शारिरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड पडत आहे.वेंगुर्ले तहसिलदार कार्यालय, दिवाणी न्यायालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, प्रादेशिक फळसंशोधन केंद्र वेंगुर्ले, उपजिल्हा रुग्णालय, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कोषागार ट्रेझरी, रजिस्ट्रार कार्यालय, तसेच शहरातील पर्यटन स्थळे,वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालय व बाजारपेठ, शासकीय मालाची गोदामे आदींकडे जाणारे रस्ते,त्यांचे अंतर, जाण्याचा मार्ग समजण्यासाठी बाण अशा प्रकारे मुख्य तिठा व चौकाच्या ठिकाणी लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचून प्रवासाचा आर्थिक भुर्दंडही वाचणार आहे.वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाचे ठिकाण हे दोन रस्त्यांच्या मध्ये आहे, पण त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय दर्शविणारा फलकच नाही. तसेच नुतन पंचायत समिती कार्यालय, तहसिलदार कार्यालय प्रशासकीय इमारत यांचेकडे जाणारे दोन रस्ते आहेत.या दोन्ही रस्त्यांच्या तिठ्यावर मार्गदर्शक फलकांची सर्वसामान्य नागरिकासाठी आवश्यकता आहे. याची पूर्तता सार्वजनिक बांधकाम खाते, वेंगुर्ले नगरपालिका वा संबंधित विभागामार्फत करून त्याची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्यासह,शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा चिटणीस मकरंद परब,डॉकटर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, विनायक सावंत, महिला शहराध्यक्ष सुप्रिया परब, युवती शहराध्यक्ष अपूर्वा परब, सचिन शेट्ये, उल्हास कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page