कुडाळ /-


तेंडोली देव वावळेश्वर हनुमान मंदीराकडे जाण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुलासाठी अठरलाखाचा निधी देऊन या मंदीराकडे जाण्याची गैरसोय दुर झाली परंतु मेनरस्त्यापासुन मंदीरापर्यंत येणा-या रस्त्याच्या अडचणी स्थानिक पातळीवर मिटवून द्या निधी देण्याचे काम शिवसेना आमदार वैभव नाईक निश्चित करतील अशी ग्वाही शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दीली
श्री देव वावळेश्वर हनुमान वर्धापन दिन सोहळ्यात डबलबारी भजन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी श्री बंगे बोलत होते ते बोलताना म्हणाले या मंदिरात कार्यक्रमानिमित्त येण्याची संधी इथले तरुण व व्यवस्थापन समिती गेल्या दोन वर्षांपासून मला देत आहे इथले कार्यक्रम निट निटके असतात नियोजन चांगले असते परंतु गेल्या दोन वर्षापुर्वी आलो होतो त्या वेळी अगदी छोटा साकव होता ही गैरसोय लक्षात घेऊन तेंडोली शिवसेना विभाग प्रमुख संदेश प्रभु व काँग्रेसचे विजय प्रभु यांच्या समवेत आमदार वैभव नाईक यांच्या कडे या गैरसोयी बाबत लक्ष वेधले असता या पुलासाठी आम नाईक यांनी अठरालाख रुपयांचा निधी उपलब करुन दीला येत्या चार दीवसात कामही सुरू होईल परंतु मेन रोड ते मंदीरापर्यंत येणाऱ्या रस्ता होण्यासाठी काही स्थानिक अडचणी असतील तर त्या सांघिक पणे मिटवून द्या निधी देण्यासाठी आम नाईक मागे पुढे पहाणार नाहीत ही ग्वाही आपण देतो असे बंगे यांनी सांगितले यावेळी कुडाळ तालुका पंचायत समिती माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनीही विचार मांडले व्यासपीठावर सरपंच श्री मंगेश प्रभु, पोलीस पाटील संजय नाईक, माड्याची वाडी सरपंच श्री सचिन गावडे, तेंडोली शिवसेना विभाग प्रमुख संदेश प्रभु, बुवा गुंडु सावंत, बुवा संदीप लोके, तातु राऊळ व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page