कुडाळ/-

नूतन आईर यांचे पती नागेश आईर हे प्रत्येक कामात आपला स्वार्थ साधत आले आहेत.त्यांच्या स्वार्थी राजकारणाचा इतिहास कुडाळच्या शिवसैनिकांना माहित होता. नागेश आईर यांचा शिवसेना प्रवेश देखील स्वार्थापायीच होता. त्यामुळे त्यांच्या पत्नी नूतन आईर यांना सभापती करण्यास शिवसैनिकांनी विरोध केला होता. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांच्या शिफारशीमुळेच नूतन आईर यांची कुडाळ पंचायत समिती सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील मनाचे पद देऊन सुद्धा संजय पडते यांच्या विश्वासास नूतन आईर पात्र ठरल्या नाहीत. गेल्या पाच वर्षात आईर यांनी काँग्रेस, शिवसेना भाजप असे ३ पक्ष बदलले. त्यामुळे संजय पडतेवर टीका करण्याची नूतन आईर यांची पात्रता नाही असा टोला शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी लगावला. नागेश आईर हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संजय पडते यांच्याकडे वारंवार विनंती करत होते. विकास निधीची मागणी करत होते. त्यामुळेच संजय पडते यांनी नागेश आईर यांना शिवसेनेत प्रवेश दिला. विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला. कुडाळचे मानाचे सभापती पद देऊनही नागेश आईर हे "आस्तीन का साँप" ठरले. आता तर शिवसेना सदस्यांप्रमाणे भाजप सदस्य देखील सभागृहात सभापती नूतन आईर यांच्या विरोधात गेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आपल्याच विरोधात का यांचे आत्मपरीक्षण नूतन आईर यांनी करावे. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा अभिनंदनाचा ठराव संजय पडते यांनीच नाही तर कुडाळमधील अनेक लोकप्रतिनिधींनी पंचायत समिती सभागृहात अनेक वेळा घेतला आहे.त्यामुळे जर आपलेच सदस्य आपले ऐकत नसतील तर नूतन आईर यांना सभापती पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा पोलखोल बबन बोभाटे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page